भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी पाय मजबूत रोवले असले तरी सॅमसंग कंपनीने आपले ग्राहक मोठ्या प्रमाणात जोडून ठेवले आहेत. सॅमसंग गॅलॅक्सी एम 53 5G हा स्मार्टफोन शुक्रवारी भारतात लाँच झाला आहे . ह्या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 – इंचाचा सुपर AMOLED + डिस्प्ले देण्यात आला आहे.तसेच 108 मेगापिक्सेल क्वाड रियर जबरदस्त कॅमेरा सेटअप आहे . Android 12 ‘ या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो . फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी आहे ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते .
भारतीय बाजारपेठेतील त्याची किंमत ही 6GB + 128GB स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 23,999 रुपये असेल तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये असेल असे सांगितले जात आहे.
त्यामुळे किंमत व फीचर्स पाहता हा फोन बाजारात धुमाकूळ घालणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
Comments are closed