पिंपरी, दि. २६( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहरात उन्हाळ्याच्या झळा वाढताच पाण्याची टंचाई निर्माण होवू लागली आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा घोषणा ही स्वप्नवत राहीली. मात्र पाणी टंचाई वर पर्याय म्हणून काही नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करत सरळ नळालाच मोटारी जोडल्याचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. अशा गैरप्रकारावर फ क्षेत्रीय विभाकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

प्रभाग क्र. १२,मधील रुपीनगर,अजिंक्यतारा सोसायटी या भागा मध्ये ‘फ ‘क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने एकूण १२ अनधिकृत नळजोड बंद केले व मनपाच्या थेट नळाला लावलेल्या एकूण ८ विद्युत मोटर्स जप्त केल्या. या कारवाई पथकामध्ये उप अभि.१, क.अभि.२,मीटर निरिक्षक २,महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे ४ कर्मचारी, मनपाचे प्लंबर २, फिटर २, मजूर ४, वायरमन २,अतिक्रमण गाडी चालकासह १ अशा एकूण २१ जणांच्या पथकाने ही कारवाई केली.

सदर कारवाई शहाजी गायकवाड ,उप अभियंता,अभय कुलकर्णी,कनिष्ठ अभियंता, मीनल दोडल, कनिष्ठ अभियंता,फ क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने केली . ही कारवाई सह शहर अभियंता ,पाणीपुरवठा विभाग व कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा फ क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्गदर्शनाखाली, करण्यात आली.

अशी माहिती रामनाथ टकले
कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा फ क्षेत्रीय कार्यालय यांनी दिली आहे.




 


 

 

Comments are closed

error: Content is protected !!