पुणे, दि. २७ ( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुरूवात करून मिसळ प्रेमींच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी मिसळ म्हणून साईछाया मिसळ चे नाव घेतले जाते. मराठी अभिनेत्यांची आवडती मिसळ म्हणूनही साईछाया मिसळ ने नावलौकिक मिळवला आहे. आजपर्यंत जवळपास १५० मराठी कलाकारांनी साईछाया मिसळचा मनमुराद आस्वाद घेतला आहे.
यातच “सर्वोत्तम मिसळ “असा पुरस्कार फूड अँड ड्रग्स वेल्फेअर कमिटी (FDWCVC)तर्फे “साई छाया मिसळ ‘ला मिळाला.
आज खवैय्यांच्या वाढत्या मागणीनुसार साईछाया मिसळ चा चार शाखांत विस्तार झाला आहे. काळा मसाला ही मिसळची खासियत असून हा मसाला घरगुती पद्धतीने हाताने बनवला जात असल्याने जिभेवर रेंगाळणारी चव देतो. अशी ही स्वादिष्ट मिसळ पुणे परिसरात दिवसेंदिवस मिसळप्रेमींच्या पसंतीस पुरेपूर उतरत आहे.
शाखा क्र.१ वेळू , शिंदेवाडी ( पुणे सातारा महामार्ग)
२. खेड शिवापुर ( पुणे सातारा महामार्ग)
३. मगरपट्टा सिटी, हडपसर.
४ . गंगाधाम चौक, मार्केट यार्ड बिबवेवाडी
त्याबद्दल बोलताना साईछाया मिसळ चे मालक मंगेश काळे म्हणाले की, ” कामातील सातत्य, प्रयत्न, श्रम व आई, पत्नी कुटुंबाची साथ यास आज यशाची किनार लाभली. माझ्या मागे सतत ठामपणे ऊभे राहून व्यवसायचे धडे, गुरुकिल्ली देणारे माझे मामा उद्योजक बाळासाहेब रत्नपारखी यांना पहिले गुरू म्हणून सर्व श्रेय जाते तसेच देणारी माझी दिवंगत आईस हा आयुष्यातील पहिला पुरस्कार समर्पित करतो.”
Comments are closed