मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक उलथापालथ सुरू आहेत , अनेक गौप्यस्फोट सुरू आहेत . रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. असाच आणखी एक गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे .
एका दैनिकाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, 2017 सालीच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती.शिवसेनेची रोजची धमकी , राजीनामा खिशात घालून फिरत असल्याची वक्तव्यं , यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी अशी भूमिका भाजपने त्यावेळी घेतली होती .
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी होण्यापूर्वी दोन वर्षे आधीच, 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युतीची चर्चा झाली होती अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली .
यावेळी २०१७ राष्ट्रवादीने आणि भाजपने एकत्रित यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती . भाजपच्या नेतृत्वाने नंतर भाजप – शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं सरकार स्थापन करु अशी भूमिका मांडली. मात्र ” यावेळी तीन पक्षांच्या सरकारला राष्ट्रवादीने विरोध केला . आपलं आणि शिवसेनेचं कधीच जमणार नाही असं राष्ट्रवादीने त्यावेळी सांगितले . राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने मात्र शिवसेनेला सोडण्यास नकार दिला . पण २०१९ साली सत्ता दिसताच शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली .
” दरम्यान , आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली . ते म्हणाले की , ” राष्ट्रवादीनं ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असे तेव्हा म्हटले , त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे . शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती सहज बदलू शकते याची भाजप साक्षीदार असल्याचे म्हटले.
Comments are closed