पुणे, दि. २८ ( punetoday9news):- भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत .
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की , ” उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषत : मशिदींवरील भोंगे उतरवल्याबदद्ल योगी सरकारचे मन : पूर्वक अभिनंदन आणि आभार . आमच्याकडे महाराष्ट्रात ‘ योगी ‘ कुणीच नाही , आहेत ते फक्त सत्तेचे भोगी . ” महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो , हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना . ”
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 मे 2022 रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे . ही सभा औरंगाबादमधील सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले . पण अजूनही पोलिसांकडून या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही .
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं की , ” राज ठाकरेंच्या सभेबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त दोन दिवसात निर्णय घेतील . ” राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठीचा टिझर मनसे कार्यकर्त्यांकडून रिलीज करण्यात आला आहे . या टिझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख ‘ संभाजीनगर ‘ असा करण्यात आला आहे .
चला संभाजीनगर pic.twitter.com/AE06KuFwb7
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 26, 2022
Comments are closed