पिंपरी, दि. ३०( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहरात उन्हाळ्यामुळे पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत असताना  शहरातील विविध भागात अनधिकृत नळजोड मोटारींवर कारवाई करण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

यात  प्रभाग क्र. 20 फुले नगर येथे महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होत असलेल्या नळाला लावलेल्या एकूण १९ विद्युत मोटर्स जप्त केल्या.

सदर कारवाई ही उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह बीट निरीक्षक राजदीप तायडे, मीटर निरिक्षक हटकर, प्लंबर वारे आणि भाईप, तसेच राज्य राखीव सुरक्षा बलाचे 22 कर्मचारी, २ फिटर, ६ मजूर, २ वायरमन, १ अतिक्रमण वाहनासह चालक अशा एकूण 30 जणांच्या पथकाने केली.

ह प्रभागाचे उपअभियंता प्रकाश सगर, चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, दिग्विजय पवार, सन्मान भोसले यांच्या पथकाने सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.




 

 

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना. 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!