पुणे, दि. १( punetoday9news):- संपूर्ण  जगभरात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो . हा दिवस साजरा करण्यास १ मे १८८६ साली सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.

कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर १ मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो.

१८७० च्या दशकात अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी आपल्या कामाचे तास ८ तासांपेक्षा जास्त न करण्यासाठी आंदोलन केले होते . बघता बघता या आंदोलनाने मोठे रूप धारण केले . १ मे १८८६ साली अमेरिकेत ११ हजार कारखान्यातील जवळपास ४ लाख कामगारांनी या आंदोलनात भाग घेतला आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कारखानदारांवर आणि सरकारवर दबाव आणला . कामगारांच्या या आंदोलनापुढे सरकार आणि कारखानदार झुकले . या घटनेच्या सन्मानार्थ १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो . जगभरातील सुमारे ८० देशांत हा दिवस साजरा केला जातो .

 

 

 

 

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना.

 




 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!