संपूर्ण जगभरात वाढते तापमान चिंतेचा विषय बनला आहे. यावर कित्येकदा चिंतन होते तापमान वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना ठरवल्या जातात पण या उपाययोजना शंभर टक्के कृतीतून उतरल्या जात नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज दिवसेंदिवस संपूर्ण जगभरात तापमान वाढत आहे.
महाराष्ट्रातील विदर्भात यंदा मार्च महिन्यामध्ये देशात १२२ वर्षांमधील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती . हवामानाची नोंद होत असलेल्या कालावधीतील तापमानाचे सर्व उच्चांक मार्च महिन्याने मोडले . एप्रिलमध्ये संपूर्ण देशातील १२२ वर्षांतील चौथे उच्चांकी तापमान नोंदविले गेले . मात्र , देशाच्या उत्तर – पश्चिम भागासह विदर्भाचा समावेश असलेल्या मध्य भारतामध्ये यंदा एप्रिलमधील तापमान १२२ वर्षांतील पहिले उच्चांकी तापमान ठरले . २९ एप्रिलला चंद्रपूरला उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती . तो उच्चांक एकाच दिवसात मोडीत निघाला . शनिवारी ( ३० एप्रिल ) चंद्रपूरमध्ये ४६.६ अंश कमाल तापमान नोंदविले गेले .
Comments are closed