पुणे, दि. २ ( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर व राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अक्षय ब्लड बँक हडपसर, यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी महाविद्यालयातील बहुतेक विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन व स्वागत केले. तसेच फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ.शेवाळे यांनी सर्व रक्तदाते विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या शिबिराचे सर्व नियोजन व आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना.
Comments are closed