सांगवी, दि.३ ( punetoday9news):-  सांगवी परिसर महेश मंडळतर्फे कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया व यांच्या स्मरणार्थ २५व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले .

यावेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर माई ढोरे, हर्षल ढोरे, सुजाता पलांडे , शारदाताई सोनवणे, सतीश लोहिया, गजानंद बिहाणी आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात २३२ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी पुना हॉस्पिटल व इंडियन सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल , मुकुंद तापडिया , गणेश चरखा ,तुषार चांडक , पंकज पंपालिया यांनी सहकार्य केले.

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!