दशक्रिया विधी पिंपळे गुरव येथील दशक्रिया घाटावर दि. 5 मे सकाळी 8:30 वा. होणार.
ह.भ.प.श्री चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रवचन.
नवी सांगवी, दि. ४ ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मारुती (भाऊ) नागुजी कवडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. असून दि. 5 मे रोजी पिंपळे गुरव येथील दशक्रिया घाटावर सकाळी 8:30 वाजता दशक्रिया विधी होणार आहे.
मारुती कवडे हे मारुतीभाऊ या नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. मारुती कवडे हे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे जुने मित्र व खंदे समर्थक होते. त्यांचा ज्येष्ठ नागरिक व तरुण पिढीशी चांगला संपर्क होता त्यामुळे त्यांचे स्थानिक राजकारणातही चांगले प्रभुत्व होते.
नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागामध्ये त्यांचे मोठे सामाजिक कार्य होते. सर्व मित्र परिवाराच्या मदतीला धावून जात असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यामुळे स्थानिक नागरिकांत एक आदराचे स्थान होते.
त्यांचे 24 एप्रिल रोजी अल्पशा आजारामुळे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाल्याने स्थानिक नागरिकांना मध्ये शोककळा पसरली आहे. दि. 5 मे रोजी पिंपळे गुरव येथील दशक्रिया घाटावर सकाळी 8:30 वाजता दशक्रिया विधी होणार आहे व ह.भ.प.श्री चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रवचन होणार आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना
Comments are closed