दापोडी, दि. ४( punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी उज्वला उपाध्ये – कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या निमित्ताने त्यांचा प्रशालेच्या शिक्षकांकडून त्यांचा स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य विठ्ठल कढणे, पर्यवेक्षक रवींद्र फापाळे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव मिलिंद संधान, राजु रघावंत, तुषार करमाळकर, महेश जोशी, सुधाकर कांबळे उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्या कुलकर्णी म्हणाल्या कि, १२ जून १९८९ रोजी ज्या प्रशालेत उपशिक्षिका म्हणून रुजू झाले त्याच प्रशालेत आज ३३ वर्षांनी प्राचार्यपदी विराजमान झाले याचा आनंद आहेच पण त्याचबरोबर जबाबदारी वाढली याचीही जाणीव आहे. माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने विद्यार्थी संख्या कशी वाढेल यासाठी आणि शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून भविष्यासाठी त्यांना मार्गदर्शक ठरतील अशी व्याख्याने आयोजित केली जातील. गेल्या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच पण अभ्यासाची गोडी देखील कमी झाली ती वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
जनता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र होण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रार्थना 

 

साईछाया मिसळला सर्वोत्तम मिसळ पुरस्कार

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!