तळेगाव दाभाडे ,दि. ५ ( punetoday9news):- तळेगाव दाभाडे येथील आर.एम.के. ग्रुपच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून, ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे ‘आई’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (दि.07) सायंकाळी 6.00 वाजता तळेगाव दाभाडे येथील सत्य कमल कॉलनी येथे होणार आहे.
जय गणेश मित्र मंडळ, विद्याविहार मित्र मंडळ, गुरुवर्य कला क्रीडा मंडळ, नम्रता सहकार मित्र मंडळ, रेनोचा राजा मित्र मंडळ, वरद विनायक क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ इंद्रायणी मित्र मंडळ स्वामी समर्थ मित्र मंडळ, तरुण ऐक्य मित्र मंडळ, जनसेवा मित्र मंडळ आदी तळेगाव दाभाडे येथील मंडळांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजक रणजीत काकडे यांनी दिली.
राजर्षी शाहू महाराज अभिवादन.
Comments are closed