भोर,दि. ५ ( punetoday9news):- भोर तालुक्यातील सावरदरे येथील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्र दिनास १ मे रोजी झेंडा फडकवलेला झेंडा २ दिवस उतरवलाच नाही. यामुळे राष्ट्रध्वज तसाच दोन दिवस फडकत राहिला. याची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज खाली घेतला.
या अवमान प्रकरणी कामचुकार शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र येथील ग्रामपंचायत प्रशासन व सजग नागरिकांनी देखील याबाबत सतर्कता पाळून झेंडा उतरवायला हवा होता. शिक्षक वादात गुंतले आणि गावही तसेच त्याकडे पाहत झोपी गेले असाच काहीसा हा प्रकार झाला आहे.
मुख्याध्यापक संजय भगवंत पापळ (रा. सासवड, ता. पुरंदर ), शिक्षक प्रविण खंडेराव नांदे (रा.आळंदे, ता. भोर ), अमजद अब्बाद पटेल व शितल कृष्णा टापरे (दोघेही रा. खंडाळा, ता. खंडाळा ) अशी नेमणुकीस असलेल्या शिक्षकांची नावे असून राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी राजगड पोलिसांनी मुख्याध्यापक संजय पापळ याच्यावर गुन्हा दाखल केला असून इतर तीन शिक्षकावर ठपका देखील ठेवला आहे.
याबाबत राजगड पोलिसांना समजताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस हवालदार जगदीश शिरसाठ, कॉन्स्टेबल योगेश राजिवडे यांनी राष्ट्रध्वजास योग्य ती मानवंदना देऊन राष्ट्रध्वज खाली उतरविले. झेंडा अवमानप्रकरणी संबंधित शिक्षकावर कारवाई करणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सांगितले.
Comments are closed