पिंपरी,दि. ६( punetoday9news):-
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन दीर्घायुष्य लाभावे, यासाठी दापोडी येथील श्री फिरंगाई देवी मंदिरात महाआरती करण्यात आली.
लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ते आजारातून लवकर बरे व्हावेत. तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी माजी नगरसेवक सागर आंघोळकर, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, शिवाजी निम्हण, मनोज कर्नावट यांच्या हस्ते आरती व प्रार्थना करण्यात आली.
फिरंगाई देवी मंदिर उत्सव समिती अध्यक्ष गणेश काटे, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, शिवाजी निम्हण, मंगेश नवघने, शिवाजी काटे, राकेश काटे, विनायक काटे, पुजारी सुरेंद्र चंद्रकांत काटे, ऋषभ काटे, मुकुंद बाराथे, फिरंगादेवी उत्सव समितीचे सदस्य, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Comments are closed