मुंबई, दि. ९ ( punetoday9news):- राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. पण जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डाकडून दिली आहे. परीक्षेतील शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची परंपरा  आहे. मात्र यंदा इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असं बोर्डानं म्हटलं आहे. तसंच बारावीचा निकाल लागल्याच्या १० दिवसांनंतर इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील असे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील दिले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!