मुंबई,दि. १२( punetoday9news):- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील  विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे.

ते अंधेरी पूर्व २ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते . सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत .मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून  1997 मध्ये निवडून गेले . त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले .

तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले . त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीतही अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून दिले .

 

आंध्रप्रदेश मध्ये वाहत आला सोनेरी रथ. 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!