सांगवी, दि. १२ ( punetoday9news):- राष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सांगवीतील महापालिकेच्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान व ओम साई फाउंडेशन यांच्या वतीने परीचारिकांना पुष्पगुच्छ, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून २४ तास रुग्णांना सेवा देऊन अनेक नागरिकांचे प्राण या परिचारिकांनी वाचवले आहेत.
परिचारिकांच्या या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना पुष्प गुच्छ श्रीफळ व सन्मान पत्र देऊन आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत असे त्याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले.
यावेळी कै.शांताराम बाईत व ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा काळभोर, डॉ.तृप्ती सांगळे, डॉ.किशोर हांडे, डॉ.सुप्रिया बिरादार, विजया साठे, सुवर्णा ताठे, लीना गायकवाड, संध्या जगताप, नीता पाटे, सविता नागरे, अंजली नेवसे, राधा कानगुडे, आशा वडुरकर, शेख तनवीर, अश्विनी शेलार, सीमा पोडाला, शेख आयशा, हर्षाली खंदारे इतर परिचारिका व मान्यवर उपस्थित होते.
आंध्रप्रदेश मध्ये वाहून आला सोन्याचा रथ?
Comments are closed