पुणे, दि. १३( punetoday9news):- पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जनाधार दिव्यांग चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी येथे दिव्यांग मेळावा संपन्न.
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने मांजरी बुद्रुक येथील जयमाला कॉम्प्लेक्स येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी बुद्रुक येथील जयमाला कॉम्प्लेक्स येथे अपंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त समाज विकास विभाग श्रीमती रंजना गगे , समाज विकास विभागाचे सहाय्यक अधिकारी सुनील साळवी, सहाय्यक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, जनाधार देवगन चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, पुणे महानगरपालिकेच्या समाजसेविका सुजाता टिळेकर, समूह संघटिका सोनाली घोडके, निर्मला शिंदे, हेमलता भोसले, पल्लवी पाटील यांच्यासह मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजीराव आदमाने, अमित घुले, पंचायत समितीचे माजी सदस्य जितीन कांबळे, पोलीस पाटील अमोल भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुभाष घुले, राजेंद्र साळवे, बाळासाहेब भोसले, गौरव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष दत्तात्रय ननावरे यांनी केले तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने अपंगांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती पुणे महानगरपालिकेच्या समाजसेविका सुजाता टिळेकर यांनी दिली तर मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजीराव आदमाने यांनी खादी मंडळाच्या वतीने दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या क्लस्टर योजनेची माहिती देत असताना सांगितले की, दिव्यांग बांधवांनी पुणे महानगरपालिकेच्या योजने बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. क्लस्टर योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या समूह गटाना व्यवसायासाठी 40% सबसिडीवर एक करोड रुपये दिले जातात त्याच बरोबर दिव्यांग बांधवांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठही मिळवून दिले जाते अशा योजनांचा दिव्यांग बांधवांनी फायदा घेतल्यास त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो असे ते म्हणाले. त्याच बरोबर मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले यांनी मांजरी आणि परिसरातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून परिसरातील सर्व दिव्यांग बांधवांना पुणे महानगरपालिकांच्या विविध योजनांची माहिती देऊन या सर्व योजना आपल्या परिसरात राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. त्याबरोबरच पुणे महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी सुनील साळवी आणि राजेंद्र मोरे यांच्यासह मांजरीचे पोलीस पाटील अमोल भोसले, सुभाष घुले, राजेंद्र साळवे, गौरव जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
Comments are closed