संयुक्त जयंतीच्या निमित्ताने गुंफले पहले पुष्प.

सांगवी, दि. १४ (punetoday9news):- विश्वभुषण, बोधिसत्व,भारतरत्न प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समीती जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कँम्प २०२२ च्या वतीने पी डब्ल्यु डी पिंपळे गुरव येथील मैदानावर १३१ व्या संयुक्त जयंतीचा चार दिवसाचा १३ मे ते, १६ मे २०२२ पर्यंत भरगच्च असा कार्यक्रम आयोजित केला असून त्यात पहिल्या सत्राचे उद्घाटन करत पहीले पुष्प नरके यांनी गुंफले.

यावेळी नरके यांनी बोलतांना सांगितले की,बाबासाहेबांच्या अफाट विदवत्तेमुळे जगाच्या पाठीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख ”ज्ञानाचे प्रतिक” म्हणुनच केली गेली आहे.
विचार महोत्सवाचे उद्घाटन संयुक्त जयंतीचे प्रमुख वक्ते प्रा हरी नरके व लोकसत्ताचे सह संपादक मधू कांबळे यांच्या हस्ते झाले.

महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे राज्य आयुक्त प्रशांत नारनवरे तर प्रमुख उपस्थितीत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे होते.

( फोटो : समाज रत्न पुरस्कार स्विकारताना गौतम डोळस, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त नारनवरे, बार्टीचे महासंचालक गजभिये, हरी नरके, मधु कांबळे, विजय गायकवाड )

महोत्सवाची प्रास्तावना संयुक्त जयंती समीतीचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी केली.
महोत्सवाची सुरूवात भारतीय संविधानाची प्रास्तावना वाचून झाली.
यावेळी पुढे बोलतांना नरके यांनी बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकांचा व घटनांचा संदर्भ देत मानव विकासाच्या आड येणा-या तथा मानवास हानीकारक अशा रूढी परंपरा,श्रध्दा यांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून १९४९ लाच संपवून टाकले असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
संविधान हाच देशाचा विकासात्मक आराखडा असून संविधान वाचविण्याची जबाबदारी तुमची आमुची आहे, त्यासाठी आता बहुजनांनी सज्ज राहीले पाहीजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महोत्सवाचे दुसरे प्रमुख वक्ते लोकसत्ताचे सहसंपादक मधू कांबळे यांनी धार्मिक,
सामाजिक व राजकीय धुरंदर बाबासाहेब या विषयावर आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म असे विश्लेषणात्मक वर्गीकरण करून जगण्यासाठी उपयुक्त धम्म कसा श्रेष्ठ यावर मार्मिक टिप्पणी केली,यातून सामाजिक व राजकीय विकासाचा पाया कसा मजबूत होवू शकतो यावर विश्लेषण केले.
यावेळी बार्टीचे महासंचालक गजभिये यांचेही समायोचित भाषण झाले.
महोत्सवाचा अध्यक्षीय समारोप करतांना सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त नारनवरे यांनी सांगितले की,आपण जे काही आहोत ते फक्त नि फक्त बाबासाहेबांमुळेच आहोत. आज भारत एकसंघ आहे तो केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आहे त्यामुळे बाबासाहेबांचे विचार तळागळातील जनसामांन्यापर्यंत पोहचले पाहीजे, मी लवकरच सामाजिक न्याय विभागात बाबासाहेबांच्या साहीत्याचे संग्राहालय सुरू करणार असव्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या महोत्सवात कालकथीत विनायक गायकवाड यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखणीय काम केल्याबद्दल गौतम डोळस यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
हिंदी भाषेत भारतातून पहील्या क्रमांकाने घवघवीत यश संपादन केलेल्या पिंपळे गुरव येथील रहीवाशी गौतमी निकम हिला ही सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला भरभरून धम्म बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती,
कार्यक्रमाच्या नियाजनासाठी समीतीचे अध्यक्ष विजय गायकवाड, संदीप नितनवरे,
गजानन कांबळे, विकास साळवे, ॲड राजेश नितनवरे, राहूल काकडे, संजय मराठे,
राहुल वाघमारे, विजय मागाडे, शंतनु डोळस आदीनी परिश्रम घेतले.

महोत्सवाचे सुत्रसंचलन शुभांगी शिंदे यांनी केले तर आभार संदीप नितनवरे यांनी मानले.

 

मोफत सौर कृषी पंप अर्जाबाबत अधिक माहिती साठी.  येथे क्लिक करा.

 

आंध्रप्रदेश मध्ये वाहून आला सोन्याचा रथ?

 

सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणार कोण? 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!