सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास https://training.scertmaha.ac.in/
या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.

यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.

सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.

अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.

?वेबसाईट : www.maa.ac.in

?वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/

?ट्विटर : https://twitter.com/scertmaha

?फेसबुक :
https://www.facebook.com/MahaSCERT

? युट्यूब:
https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw

 

एम डी सिंह,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

 




समुद्रात वाहून आला सोन्याचा रथ?

 

आंतरराष्ट्रीय निवासी आश्रमशाळेचे खानवडीत भूमिपूजन. 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!