जेजुरी. दि १६ ( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील जेजुरी शहरातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर वारंवार वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने नागरिक, भाविक व व्यवसायिक वाहतूक समस्येने त्रस्त झाले आहेत.

जेजुरी शहरातून पुणे , नीरा,  मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागतात. यात प्रवाश्यांचे हाल होतात. तर या कोंडीमुळे महामार्गावरील दुकाने व धंद्यांवरही विपरित परिणाम होत आहे.

जेजुरी शहरात एमआयडीसी व धार्मिक स्थळ असल्याने दररोज हजारो वाहने ये जा करत असतात तसेच लग्न सराई चा हंगाम असल्याने मोठ्या संख्येने भाविकांची शहरात वर्दळ असते.

यात विशेषतः गुरुवार, शनिवार, रविवार, यात्रा जत्रा व सार्वजनिक सुट्ट्यांदिवशी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.

जेजुरी पासून पुणे, मोरगाव, व नीरा मार्गावर दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.या रांगेतून बाहेर पडण्यासाठी किमान दोन तास लागत होते. त्यामुळे प्रवास करणारी लहान मुले , वृद्ध व प्रवाशी हैराण झाले होते. तर रात्रंदिवस वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांचीही चांगली दमछाक होत आहे.

या वाहतुकीच्या कोंडी मुळे रस्त्या लगत असणारी दुकाने ओस पडली होती. असा प्रकार आता वारंवार घडत आहे. जेजुरी शहरा बाहेरून बाह्यवळण रस्ता काढल्यास केवळ भाविकच शहरात येतील उर्वरित वाहने बाहेरून जातील त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून होणारी वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

जेजुरी शहरा बाहेरून बाह्यवळण व्हावे यासाठी नागरिकांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

 

सोन्याचा रथ आला समुद्रात वाहून

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!