पुणे,दि. १६( punetoday9news):- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी महागाईविरोधात झालेल्या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली पुण्यात घडली .
स्मृती इराणी यांना यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवले . तसेच शाई फेकण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . हा प्रकार बालगंधर्व सभागृहाकडे येताना जंगली महाराज रस्त्यावर घडला आहे .
महागाईविरोधात घरगुती गॅसदरवाढ, पेट्रोल, डिझेल दरवाढीची जुनी आठवण करून देत जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. कारण सत्तेत येण्यापूर्वी स्मृती इराणी या महागाईच्या मुद्यावर आंदोलन करण्यात आघाडीवर होत्या मात्र सध्या महागाईच्या मुद्यावर त्या गप्प का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
Comments are closed