पुणे, दि. १८ ( punetoday9news):- मार्च 2022 मध्ये दहावीची (SSC) बोर्डाची परीक्षा दिलेल्या व शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ वर्षात अकरावीस प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाईन ॲडमिशन साठी सराव म्हणून डेमो फाॅर्म २३ ते ३० मे पर्यंत उपलब्ध असणार आहे.
जवळपास पाच वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिये विषयी विद्यार्थ्यांना माहिती साठी सराव म्हणून डेमो फाॅर्म उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून प्रत्यक्षात फाॅर्म भरताना गोंधळ न उडता विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती होते. त्यानुसार यंदाही 23 मे 2022 ते 30 मे 2022 या कालावधी मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या कार्यक्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी डेमो फॉर्म प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध होणार आहे .
अकरावी ऑनलाईन ऍडमिन प्रवेश प्रक्रिया वेबसाईट –
https://pune.11thadmission.org.in
या वेबसाईटवर विद्यार्थ्यी फाॅर्म भरण्याचा सराव करू शकतात.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन फाॅर्म असा भरावा माहिती साठी विडिओ-
Comments are closed