दापोडी,दि. १८ ( punetoday9news):- दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील १९९७ सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.
हा स्नेहमेळावा रौप्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला होता. यावेळी जुन्या आठवणींना मित्र मैत्रिणींकडून उजाळा देण्यात आला.
या स्नेह मेळाव्यात आयुष्यात कमावलेली एकमेव दौलत म्हणजे मैत्री असल्याचे दिसून आले. या मैत्रीचा रविवारी (दि. १५) रौप्य महोत्सव केक कापून साजरा करण्यात आला.
प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. किशोर जगताप, प्राचार्य प्रा. सुर्यवंशी होते. या स्नेहमेळाव्याचे आयोजन रवींद्र बाईत व मित्र परिवार यांनी केले. ग्रुप मधील नितीन कदम, सुनील काची व गिता केळकर यांनी जुन्या व नव्या गीतांचा कार्यक्रम सादर केला .
यावेळी सचिन घटकांबळे, प्रशांत काजळे, मंजुषा खुर्देकर, किशोर शिर्के, गणेश नवजेकर, नंदा सुपेकर, शर्मिला जैन, अभय खटावकर, सचिन लोहार, पोपट पोतले, दत्तात्रय जाधव, धनराज साबळे, दिपाली काकडे, अनिल पिसाळ, योगिता पोफळे, ज्ञानेश्वर गिरंगे, संदीप केदारी,
नितीन कदम, मोहम्मद शेख, मनिषा कर्णावट, समीना तांबोळी, सुधिर कोळी, सीमा शिंदे, युवराज घुले, पिंकी मेहता, स्वाती रणसुभे, ज्योती करजगी, सुनिता कुंभार, प्रतिभा चव्हाण, अतुल डांगे, रविंद्र बाईत, संजय नेहुल, कृष्णा विटेकर, लिना गोरे, अनिल घुले, राहुल जाधव, चेतना लुंकड, उल्हास काटे, बाळकृष्ण घुले, मंगेश सावंत, विश्वास पडघमकर, विरेंद्र जवळकर, अजित जाधव, जकिरा अत्तार, संतोष नाईकरे, सुनेत्रा काजरोळकर, अर्चना काजरोळकर, कल्पना निकम, छाया भालेराव, निलेश शाह, सुनिल काची उपस्थित होते.
अकरावी प्रवेश प्रक्रिया माहिती साठी येथे क्लिक करा .
वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत माहिती साठी येथे क्लिक करा
Comments are closed