पुणे, दि.१९ ( punetoday9news):-  पुणे जिल्ह्यातील भाटघर व चासकमान या दोन धरणामध्ये आज दुर्घटना घडल्याने एकूण नऊ जणांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यात भाटघर धरणात आज पाच जणी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे . दरम्यान स्थानिक एका मुलींसह बाहेरगावाहून आलेल्या या नातेवाईक महिला असून त्या पोहण्यासाठी धरणामध्ये गेल्या होत्या .

त्यामध्ये  खुशबू लंकेश रजपूत ( वय १९ रा बावधन ) , मनीषा लखन रजपूत ( वय २० ) , चांदणी शक्ती रजपूत ( वय २१ ) , पूनम संदीप रजपूत ( वय २२ , तीनही रा . संतोषनगर , हडपसर पुणे ) , मोनिका रोहित चव्हाण ( वय २३ रा. नहे ) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत .

तर दुसरीकडे खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाण्यात सह्याद्री स्कुलच्या चार विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुदैवी मुत्यु झाल्याची घटना ( दि १९ ) रोजी साडेचारच्या वाजण्याच्या सुमारास गुंडाळवाडी  घडली आहे . यामध्ये परीक्षित अग्रवाल , रितीन डीडी हे २ विद्यार्थ्यी तर तनिशा देसाई व नव्या भोसले या विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला .

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . चासकमान धरणालगत डोंगरावर सह्याद्री स्कुल आहे . या स्कुलचे विद्यार्थी आज दुपारी चार वाजता गुंडाळवाडी चासकमान धरण परिसर क्षेत्रात आले होते . त्यांना धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडुन मुत्यू झाला आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!