पिंपरी, दि. २० ( punetoday9news):- पंचशील तरुण मंडळ कुळे यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
संलग्न ६० वा संयुक्त जयंती महोत्सव पंचशील तरूण मंडळ कुळे गाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. वक्ते, इतिहास अभ्यासक विक्रमसिंह मगर यांचे भाषण झाले त्यांनी युवा वर्गासहित सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील दादू भालेराव होते. प्रास्ताविक उमेश मराडे (अध्यक्ष) यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा व मुळशी तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष गोविंद निकाळजे, माजी सभापती रविंद्र बाबा कंधारे, संभवे गावच्या महिला कार्यकर्त्या वंदना जाधव, काँग्रेस पक्षाचे युवा सामाजिक कार्यकर्ते मधुर दाभाडे, उद्योजक अरुण मराठे आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम , सिनेअभिनेत्री सुवर्णा चौथे, सिनेकलाकार( झुंड ) सदानंद स्वामी, निक्सन डिस्कोटा, संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र चे संजय मराठे, भाजप पक्षाचे पंकज सारसर, राष्ट्रवादी पार्टीचे रवी खोकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण भालेराव यांनी केले तर अध्यक्ष उमेश मराडे यांनी आभार व्यक्त केले.
Comments are closed