पुणे दि.१० : संपूर्ण पुणे जिल्ह्यातील मोबाईलवर आज एकच विडिओ प्रसारित होत होता तो म्हणजे १४० व ४० क्रमांक सुरुवातीला असलेला काॅल येणारा विडिओ. आणि अतिउत्साही स्वतः ला तंत्रज्ञानाची माहिती आहे असं माननारे शिक्षित युवक हा संदेश अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडल्याच्या अविर्भावात पुढे पाठवत आहेत. पण कदाचित ही बातमी वाचून त्यांचा पोपट होणार हे मात्र नक्की. तेेव्हा आलेला प्रत्येक विडिओ खरा मानुन फाॅरवर्ड करणं थांबवा व एक सुशिक्षित, सुजाण नागरिक बना.

 

( काल्पनिक क्रमांक)

मुंबई पोलिसांचा व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडीओने  सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो. हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली, त्यानंतर जे सत्य बाहेर आलं ते संतापजनक आहे.

हा व्हिडिओ सोनी लाईव्ह या वाहिनेने आपल्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे कळते आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नसून सोनी लाईव्ह वाहिनेने तयार केला असून त्यांच्या प्रमोशनसाठी तो व्हायरल करण्यात आला असल्याची महिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने या व्हिडीओ ची दखल घेतली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!