पुणे,दि. २३( punetoday9news):-
पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधिर गाढवे यांची ‘सुरक्षित सिमा- समर्थ भारत’, या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित भारत माता प्रेरणा स्थळ निर्माण, “सुरक्षित सीमा – समर्थ भारत” या निमित्त आयोजित कार्यक्रमात समिधा महायज्ञ या संदेश फलकाचे प्रकाशन केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंह ढिल्लों, आचार्य लोकेश मुनि, युवाचार्य अभयदास महाराज, भारतीय विदेश सेवा अधिकारी, राकेश तिवारी , समाजसेवक डॉ. प्रमेन्द्र जांगड़ा,पार्वती जांगिड़ सुथार आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते सुधीर विश्वंभर गाढ़वे यांना राष्ट्रीय संयोजक ‘सुरक्षित सिमा- समर्थ भारत,’ अभियानाच्या संयोजक पदाचे नियूक्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.
जगात विशाल आणि समृद्ध असलेल्या आपल्या भारत देशाच्या सिमा, प्रांत, भूभाग तेथील स्थानिक रहिवासी, येथील सैनिक बळ,
सिमा भागातील गावं, नद्या, पर्वत, कडे पठार, वाळवंट, निसर्गाची लाभलेली देणगी,अलौकिकता
तर शत्रुची घुसखोरी,त्यांच्या चाली,सिमावर्ती भागात होणारी तस्करी याबाबत ते संपूर्ण देशवासीयांना विवेचन करणार आहेत.
यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आपल्या जिवनातील सिमावर्ती भागातील विस वर्षांच्या कार्याचा जिवनपट विशद केला.
याचबरोबर जनरल ढिल्लो, आचार्य लोकेश मुनी, अभयदास महाराज यांनी अनुभव विशद केले.ज्येष्ठ समाजसेवक गाढ़वे हे “शून्य उत्सर्जन व शून्य जल प्रदूषण” या विषयाचे विशेषज्ञ आहेत. पर्यावरण आणि जलवायु परिवर्तन, संस्कृति, पर्यटन,या विषयावर नवयुवकांना ते राष्ट्र निर्माण कार्यात मार्गदर्शन करत आहेत.
यावेळी बोलताना गाढवे म्हणाले, समर्थ भारत सुरक्षित भारतासाठी हे काम पुढे न्यायचे आहे.देशासाठी बलिदान देणा-या विरांचा सन्मान,त्यांचा त्याग समर्पण देशवासियांना समजावून समर्थ सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी ही मोहीम समर्थपणे राबवयाची आहे.
Comments are closed