● कार्यक्रम 26 मे रोजी सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत सृष्टी चौक गार्डन मैदान, पिंपळे गुरव येथे होणार.

● कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू मिळणार.

पिंपरी,दि.२३ ( punetoday9news):-
पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ या बहारदार कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण असणार आहे. खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात सहभागी महिला स्पर्धकांमधून भाग्यवान महिलेस मानाची पैठणी मिळणार आहे.
भव्य बक्षिसे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
एलसीडी टीव्ही, फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, कुलर, सायकल, मोबाईल, मायक्रो ओव्हन, शिलाई मशीन, अ‍ॅक्वा गार्ड, गॅस शेगडी, होम थिअटर, इलेक्ट्रिक गिझर, 5 मिक्सर, 5 टेबल फॅन, 5 स्मार्ट वॉच, 5 एअर पॉड, 5 सोन्याच्या नथी, 5 पैंजन, 5 मेकअप बॉक्स, 1 भांड्याची झाल अशी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
हा कार्यक्रम येत्या 26 मे रोजी सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत सृष्टी चौक गार्डन मैदान, पिंपळे गुरव येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शामभाऊ मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 




Comments are closed

error: Content is protected !!