सांगवी, दि. २६ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक मुक्त शहर विशेष मोहीम २५ मे ते ११ जून या कालावधीत राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.
त्यानुसार ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आज (दि. २६) रोजी सकाळी जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्लास्टीक मुक्तीकामी जनजागृती पदयात्रा सुरवात जुनी सांगवीतून करण्यात आली.
ही पदयात्रा जुनी सांगवी व नवी सांगवी परिसरातून काढण्यात आली . यावेळी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्याधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरिक्षक चंद्रकांत रोकडे, आरोग्य निरिक्षक उध्दव डवरी, रश्मी तुंडलवार, संजय मानमोडे, सुनिल चौहान, बाबासाहेब राठोड तसेच ह क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी, करसंकलन विभागातील अधिकारी कर्मचारी, विद्युत विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच बेसिक संस्थाचे प्रतिनीधी, ग्रीन मार्शल पथक, प्रभाग क्र. ३१ व प्रभाग क्र. ३२ चे आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक असे मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्लास्टीकचा वापर टाळणेचे आवाहन करण्यात आले. प्लास्टीक मुक्तीबाबत घोषवाक्यांच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच साई चौक भाजी मंडई येथे सामूहिक प्लास्टीकचा वापर न करणेबाबत शपथ घेणात आली. मंडई परिसरात कापडी पिशवी घेवून येणा-या नागरिकांचा गूलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
तर कापडी पिशवी वापरणारे नागरिक प्लॅस्टिकमुक्ती अभियान कार्यात मोलाचे सहकार्य करत असल्याचे क्षेत्रिय अधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.
Comments are closed