पिंपरी, दि. ३१ ( punetoday9news):-  हरियाणा येथे होणाऱ्या ” खेलो इंडिया यूथ गेम्स ” कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टिममध्ये पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील मनिषा राठोड या विद्यार्थिनीची निवड हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या ” खेलो इंडिया यूथ गेम्स ” साठी पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील खेळाडू मनीषा राठोड या विद्यार्थिनीची महाराष्ट्राच्या टिममध्ये निवड झाली आहे .

मनीषा राठोड हि महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी आहे . तर याच शाळेतील शिक्षिका सोनाली जाधव यांची सहाय्यक व्यवस्थापक महाराष्ट्राच्या संघासाठी नियुक्ती करण्यात आली आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिका कला क्रीडा विकास प्रकल्पाअंतर्गत खेळणारी कुमारी मनीषा ही महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या कबड्डी संघात प्रथमच पात्र ठरली आहे .

ऑल राऊंडर म्हणून कबड्डीसाठी १९ वर्षांखालील मुली गटात महाराष्ट्र संघात निवड झालेली महानगरपालिकेची ती प्रथम खेळाडू आहे . हरियाणासाठी मुलींचा कबड्डी संघ १ जून ला रवाना होणार आहे . चौथ्या ” खेलो इंडिया यूथ गेमचे आयोजन दिनांक 3 ते 13 जून 2022 या कालावधीत हरियाणा येथे होत आहे . मनिषा राठोडला बन्सी आटवे यांचे कोच म्हणून मार्गदर्शन लाभले आहे .

या निवडीबद्दल महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे , क्रीडा अधिकारी अनिता केदारी व माध्यमिक विद्यालय थेरगावचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी मनीषा राठोडचे अभिनंदन केले . निवड झालेल्या सोनाली जाधव यांची कर्नाटकमध्ये 2019-20 साली राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली होती तेव्हा महाराष्ट्र राज्य संघ कांस्य पदक विजेता ठरला होता.

 

Advt:-

 

 

 




Comments are closed

error: Content is protected !!