पिंपरी, दि. ३१ ( punetoday9news):- कोविडमुळे व्यावसायिक क्षेत्रात होत असलेले परिवर्तन आणि उद्योगक्षेत्रात असलेली नावीन्यतेला असलेली मोठी मागणी लक्षात घेता बौद्धिक संपदा क्षेत्रात युवक महत्वाची भूमिका बजावू शकतात असं मत डॉ.एम.एस. चौधरी यांनी व्यक्त केलं.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बौद्धिक संपदा अधिकार या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या या क्षेत्रातील रोजगार संधींबद्दलही विविध उदाहरणे सांगत डॉ. चौधरी यांनी सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) फाइल करण्यासाठी व कल्पनांना कायदेशीर मालकी मिळवण्यासाठी देखील मार्गदर्शन केले. एमबीएच्या विद्यार्थ्यांनी बौद्धिक संपदा हक्क क्षेत्राबद्दल अधिकाधिक सजग राहावे व या क्षेत्रातील करिअर संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. निशांत पाचपोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कोमल भुतडा या विद्यार्थिनीने केले. विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय अशाप्रकारच्या तज्ञ् व्यक्तीच्या अनुभवी मार्गदर्शनपर व्याख्यानातून खूप काही शिकण्यास मिळते असे मत आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी यावेळी व्यक्त केले.
Advt:-
Comments are closed