सांगवी, दि. ३१ ( punetoday9news):- पुणे जिल्हा रुग्णालयामध्ये तंबाखू सेवन केल्याने विविध प्रकारचे कर्करोग होतात ह्या आजाराचे प्रबोधन करण्यासाठी तंबाखू सेवन न करण्या बाबत प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमा मध्ये डॉ राम पाटील हे कर्करोग तज्ञ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी त्यांनी अनेक तंबाखू सेवन केल्याने विविध प्रकारचे कर्करोग झालेल्या व सदर आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांना मार्गदर्शन केले यामध्ये तंबाखू सेवन केल्याने तोंडाचे आजार कसे होतात त्याची सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमा चे प्रास्ताविक सुहासिनी घाणेकर यांनी केले. त्यांनी सांगितले की आम्ही सदर रुग्णालयात गेली सोळा वर्ष तंबाखू मुक्ती करिता प्रबोधन करून अनेक रुग्णांना कर्करोगा पासून मुक्ती दिल्याची माहिती दिली.
यावेळी पुणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव कणकवली यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी पुणे जिल्हा रुग्णालय चे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ वर्षा डोईफोडे ,डॉ प्रकाश रोकडे,रुग्णालय अधिकारी रौनक शेरा ,रुग्णालय अधीसेविक मंगल जाधवर यांच्यासह अनेक अधिसेविका व वैद्यकीय अधिकारी हजर होते.
Advt:-
Comments are closed