● कार्यकर्त्यांच्या प्रार्थनेला यश; सर्व प्रार्थनास्थळी भाऊंच्या स्वास्थ्यासाठी करण्यात आली होती प्रार्थना.
● सोशल मिडिया वर परिसरात
सर्वत्र king is back चे स्टेटस.
पिंपरी, दि. २( punetoday9news):- चिंचवड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना हाॅस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हजारो च्या संखेने विविध धार्मिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली होती. त्यांना हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी हाॅस्पिटल ते घरापर्यंत ठिकठिकाणी थांबून त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. भाऊंना समोर पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments are closed