नाशिक:-  लाॅकडाऊन काळातील ३ महिन्याचे घरगुती वीज बिल हे वीज कंपन्यांनी महाराष्ट्रभर वाढीव दराने ग्राहकांना दिले आहे. कोरोनामुळे शेतकरी, कामगार , व्यावसायिक , मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना त्यात वाढीव वीजबिल देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळले आहे  .  या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन राज्यभर सोमवार १३ जुलै रोजी होणार आहे.
त्यानुसार दिंडोरी तहसील कार्यालयासमोरही स. ११ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व दिंडोरी तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता निवडक प्रमुख पदाधिकारी राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे , ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे , युवा नेते राकेश शिंदे, जिल्हा सचिव संपत जाधव उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ही घरगुती वीज बिल माफ करावे .अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे.आंदोलनाला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी  मास्क लावून व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन कड यांनी दिली.

Comments are closed

error: Content is protected !!