पुणे, दि. ५ ( punetoday9news):- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने दि.18 ते 20 जून 2022 या कालावधीत राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात प्रत्येक राज्यातून उत्कृष्ट प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी 4मुले व 4मुलींची निवड करण्यात आली असून विद्यानंद भवन हायस्कुल निगडी ची योगापटू सिद्धी कुलकर्णी व कुशल महाजन यांची निवड झाली आहे.
या दोघांनी यापूर्वी ही कमी वयात राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. या दोघांना भारतीय योगा टीम चे कोच योगगुरू चंद्रकांत पांगारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या दोघांची निवड झाल्याने मुख्याद्यापिका छाया हब्बू, पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे, क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव, शीतल म्हात्रे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Comments are closed