मुंबई, दि. ५( punetoday9news):- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी सन २०२२ च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुरस्कारासाठी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झाली आहे. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील इच्छुक पात्र शिक्षकांनी दि. २० जून २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले आहे
Comments are closed