पिंपरी, दि. ५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील विशालनगर येथे पिंपळवन संस्थेमार्फत परिसरात प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम रबावण्यात आली. तसेच स्मृतीवन व आनंदवन या दोन नवीन अभिनव उपक्रमाची वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली.
परिसरात स्वच्छतेविषयी घोषणा देत जनजागृती रॅली काढण्यात आली व 500 कापडी पिशवी वाटप करून प्लास्टिक विरोधात घोषणा देण्यात आल्या. संवर्धन कार्यात ज्या निसर्गमित्रांचा मोलाचा सहभाग लाभला अशा सदस्यांचा तुळसीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका आरती चोंधे, जनसेवक शिरीष आप्पा साठे, सचिन साठे, गणेश कस्पटे, नितीन इंगवले, विश्वास जपेकाका, संकेत चोंधे, संकेत जगताप, विजय पाटुकले, पिंपळवन संस्थेचे सर्व सभासद, पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचे सदस्य, इंडियन सायकलिंग क्लबचे सदस्य, हिंद मित्र मंडळ सेवा ट्रस्ट चे सदस्य व परिसरातील सर्व निसर्गमित्रानी सहभाग घेतला.
पिंपळवन निसर्गसंवर्धन ग्रुपचे चंद्रकांत ववले यांनी जागतिक पर्यावरण दिवसाचे महत्त्व सांगून आलेल्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
आमदार लक्ष्मण जगताप यांना रूग्णालयातून डिस्चार्ज.
पिंपरी-चिंचवड: जागतिक पर्यावरण दिवस.
Comments are closed