नाशिक दि.१३ :- लाॅकडाऊन काळातील ३ महिन्याचे घरगुती वीज बिल हे वीज कंपन्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वाढीव दराने दिले असल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन करून तहसीलदार सुर्यवंशी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
आज देशातली सर्वसामान्य जनता कोरोनाने पिचली आहे. राज्यामध्ये दुबार पेरणी , खत औषधांची टंचाई, भाव वाढ, बोगस बियाणं, बेरोजगारी या समस्या उभ्या ठाकल्या असताना वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांच्या नरड्यावर पाय देण्याचे कामच वीज कंपन्यांनी केले असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मांडले.
प्रतिक्रिया विडिओ –
– संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.
जनतेला आधार देण्याची गरज असताना पेट्रोल डिझेलच्या रूपानं केंद्र शासन व वीज बिलांच्या रूपाने राज्य शासन यांच्यात जनतेची लूट करण्याची टांगा शर्यत सुरू आहे की काय? असा प्रश्न पडतो. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तीन महिन्याचे वीज बिल शासनाने माफ करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पणे रस्त्यावर उतरले असा इशाराही त्यांनी दिला.
गंगाधर निखाडे यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेची परिस्थिती लक्षात घेता वीज बिल माफीची मागणी योग्य आहे व आपल्या शासनाने ती मान्य करावी असे मत व्यक्त केले. प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे यांनी देखील विचार व्यक्त करत वाढीव बिलांचा निषेध केेेेला.
या आंदोलनात ज्योतीताई देशमुख, दिलीपराव जाधव,वसंतराव थेटे,वसंतराव कावळे,गणेश हिरे,राकेश शिंदे,संपत जाधव , अभय सूर्यवंशी , सचिन कड , या विविध पक्ष , संघटना, संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दत्ता सोनवणे, किरण पाटील, नारायण संधान, शंकर फुगट, संजय थोरात, योगेश संधान, अजय पाटील, प्रभाकर मोरे, जयराम फुगट, आनंदा वाघ, गोरख लभडे, विश्वास संधान , वैभव जगताप, सतीश सोनवणे ,सचिन लभडे यांच्या सह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed