शिरूर, दि. ७ ( punetoday9news):- शिरूर तालुक्यातील खैरेनगर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित पंचवार्षिकच्या निवडणूकीत जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलला दणदणीत विजय मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कडून नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
खैरेनगर विविध विकास सोसायटी निवडणूक २०२२ जय हनुमान शेतकरी विकास पॅनल व हनुमान पाचपिर बाबा विकास पॅनल यांच्यातील लढत शिरूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. खैरेनगर विकास सोसायटीची मागील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती परंतु यावेळी निवडणूक ही बिनविरोध न होता चांगल्या संचालकांची निवड होणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार हे नक्की होते यात जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या ११ ही उमेदवारांनी बाजी मारत विजयाचा मान जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलकडे खेचून आणला.
आज झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलचे खैरे ज्ञानेश्वर रखमाजी, खैरे मंदा कारभारी, खैरे तात्याबा नाना, खैरे नामदेव तुकाराम, खैरे सुंदर एकनाथ, खैरे पाटीलबुवा दगडू, खैरे रामदास दगडू, खैरे शिवाजी ज्ञानोबा, खैरे शांताराम पाटीलबुवा, शिंदे तुकाराम शंकर, सातपुते श्रीकांत नारायण हे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.
या सर्व उमेदवारांचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, उद्योजक विजूशेठ जगताप यांच्याकडून अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments are closed