पुणे, दि. ७( PUNETODAY9NEWS):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळ https://t.co/smigUpoDgw
https://t.co/FdRA3f0Z7F
https://t.co/9RSdZPJJju
https://t.co/TDGwj5sZiU
https://t.co/88JhHXJzut
https://t.co/xdH9GVndoE
https://t.co/eSeRrHzvgo
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे उद्या दुपारी 1 वाजता mahahsscboard.in वर निकाल जाहीर होईल. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाईल. पुढील साइटवरही तुम्ही आपला निकाल पाहू शकता – mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
बारावीचा निकाल कसा तपासायचा ?
1). महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा – mahresult.nic.in
2). मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
3). HSC निकाल 2022 ( कला, विज्ञान किंवा वाणिज्य ) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
4). लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
5). तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
6). तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12 वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
आमदार लक्ष्मण जगताप यांना रूग्णालयातून डिस्चार्ज
*उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल 8 जून रोजी*
मुंबई, दि. 7- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक ०८ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत. www.mahresult.nic.in www.hscresult.mkcl.org https://hsc.mahresults.org.in https://lokmat.news18.com https://www.indiatoday.in/education-today/results https://mh12.abpmajha.com https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet
या परीक्षेस राज्यातून १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या पैकी ८,१७,१८८ एवढी मुले असून ६,६८,००३ एवढ्या मुली आहेत. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.
यासाठीच्या सविस्तर सूचनांसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देता येईल. या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजना उपलब्ध राहील. या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दिनांक १७ जून २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपासून वितरित करण्यात येतील. इयत्ता १२ वी परीक्षेच्या कामांमध्ये सहकार्य केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व राज्य मंडळातील तसेच सर्व विभागीय मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी आभार मानले असून परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.
Advt:-
Comments are closed