पुणे, दि.१० ( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालयात शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. रंजना पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते अभिषेक व दीपप्रज्वलनाने झाली. शिवस्वराज्य दिनाचे महत्त्व सांगताना प्राचार्यां डॉ. रंजना पृथ्वीराज पाटील यांनी शिवछत्रपतींचे मराठी माणसाच्या मनातील स्थान, छत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ, महिलांबद्दल असलेला सन्मान आणि आदर, गनिमी कावा अशा अनेक विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच प्रसिद्ध व्याख्याते मा. बालाजी काशीद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोवाडा व आदींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले यामध्ये राजकुमार काटे ,पवन जाधव ,खुशी मोरे,प्रेम मासाळ, सायली मोरे, श्रुती फुलवरे,
याप्रसंगी प्रा. माधुरी सरवदे, प्रा.सनोबर काजी,संतोष सुतार व प्रा.शिवाजी बीबे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक,आणि विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मोरे व विशाल तुपे यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments are closed