पिंपरी, दि. १०( punetoday9news):- राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षास एकेक मत महत्त्वाचे आहे . राज्यसभेच्या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली असल्याने जे आमदार आजारी असले तरीही शक्य असल्यास मतदान करावे यासाठी आदेश देण्यात आले आहेत .
भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावरही मागील काही दिवसांपूर्वीच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आज पक्षाला माझी गरज असून मी मतदान करण्यास जाणार असे सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार त्यांच्या साठी एअर अँम्बुलन्स ही आणण्यात येणार होती मात्र हवामानातील बदलामुळे प्रकृतीवर परिणाम होवु नये म्हणुन डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ते कार्डीयाक ॲम्बुलन्स मधूनच मुंबई साठी रवाना झाले आहेत.
Comments are closed