नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी जाऊन मानले आभार.

भाऊ तुम्ही ग्रेटच. – निलेश राणे. 

पिंपरी, दि. ११ ( punetoday9news):- ज्यांच्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला ते पिंपरी-चिंचवडचे लढवय्ये नेते व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांनी शनिवारी (दि. ११) रात्री पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, अशा शब्दांत खासदार मडाडीक यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आभार मानले. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करा. आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. आमदार जगताप यांनी खासदारपदी निवड झाल्याबद्दल धनंजच महाडीक यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये आले. त्यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. आमदार जगताप व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली. जगताप कुटुंबियांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांचे औक्षण करून अभिनंदन करण्यात आले.

लक्ष्मणभाऊंमुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला. भाऊ, मी तुमच्यामुळेच पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती केवळ भाजपसाठीच नाही, तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा व ऊर्जा देणारी आहे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो. तुम्ही पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत पुन्हा नव्या जोमाने लवकरात लवकर सक्रिय व्हा. आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्व प्रकारची मदत मी करणार असल्याचा शब्द महाडीक यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांना दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी ही हा विजय आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना समर्पित केला आहे. 

तर निलेश राणे यांनी ट्विट करत भाऊ सॅल्यूट तुम्हाला असे म्हटले आहे. 

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या या कार्याबद्दल ट्विटरवर ही शुभेच्छांचा प्रचंड  वर्षाव होताना दिसत आहे

 

 

 

 

 

 

 




 

Comments are closed

error: Content is protected !!