आळंदी-पंढरपूर(संत ज्ञानेश्वर महाराज) पालखी मार्ग 5 टप्प्यात तर
देहू- पंढरपूर ( संत तुकाराम महाराज) पालखी मार्ग 3 टप्प्यात पूर्ण होणार.
पालखी मार्गांसाठी 11 हजार कोटींचा निधी
पुणे, दि. १४( punetoday9news):- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूत संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून करत वारकरी संप्रदायाचे महात्म्य अभंगातून सांगितले .
नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले, संत तुकाराम महाराज यांच्यातील दया, करुणा तसेच सेवा त्यांच्या अभंगांच्या रुपात आजही आपल्यासोबत आहे. या अभंगांनी आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. ज्याचा भंग होत नाही. जो वेळेनुसार शास्वत आणि प्रासंगिक असतो तोच अभंग असतो. आज देश सांस्कृतिक मूल्यांवर पुढे जात आहे.
तुकाराम महाराजांच्या वैराग्याची साक्षीदार झालेली ही शिळा आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे.
देहूत मंदिराची खास सजावट.
Comments are closed