पुणे, दि १६( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने विधी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांची वसंतदादा साखर संकुल ,मांजरी येथे औद्योगिक भेट (Industrial Visit) चे आयोजन करण्यात आले होते. सदर भेट ही वसंतदादा साखर संकुल ,मांजरी येथे देण्यांत आली.
सदर भेटीचे नियोजन हे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वसंतदादा साखर संकुल या संस्थेचे स्वरूप , कार्य याविषयीं तेथील वरिष्ठ अधिकारी टाकळकर सखोल माहिती दिली. तसेच साखर उद्योगात संस्थेची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे सांगितले . संस्थेचे ग्रीन हाउस व वर्कशॉप ही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. विधी महाविधीलयाचे सहा. प्रा. शिवाजी बिबे यांनी विधी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे आभार मानले.
Comments are closed