पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३

बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४

पुणे, दि. १८ ( punetoday9news):- पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीजयंत्रणा धोकादायक आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी मोबाईलच्या व्हॉट्सॲप द्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्यास त्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हाट्सॲप द्वारे द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हाट्सॲप नाही त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे. झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, मुसळधार व संततधार पावसामुळे माती वाहून गेल्याने

किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे इत्यादी स्वरुपाची माहिती,तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह महावितरणच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध आहे.

व्हॉट्सअप महावितरणला नादुरुस्त किंवा धोकादायक वीजयंत्रणेची माहिती प्राप्त होताच ती ताबडतोब संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयांना पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हाट्सॲप द्वारेच यंत्रणेच्या दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!