खडकी दि.१४:- कोरोना व लाॅकडाऊन यामुळे रिक्षाचालकांचे प्रचंड नुकसान होत असून त्यांना न्याय मिळावा या हेतूने अखिल खडकी चालक, मालक रिक्षा संघटने तर्फे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षात तर परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल सोनवणे, रवी गायकवाड, अझर खान , गणेश कांबळे, मोहन प्रताप, नंदु परदेशी , विजय दिवेकर, महेश वाघमारे उपस्थित होते.
कोव्हीड१९ महामारीच्या साथीमुळे संपूर्ण देशातील अर्थ व्यवस्था बिगडली असून त्यात अनेक उद्योग व्यवसाय, कंपन्या, शाळा बंद असल्यामुळे रिक्षा व्यवसायावरही मोठा विपरीत प्रभाव पडला असून रिक्षा चालकांवर उपास मारीची वेळ आली आहे. रिक्षा चालकांचे जगणे अवघड होवून कौटुंबिक व आर्थिक गणिते बिघडली आहेत त्यात बँक , पतसंस्था यांचे कर्ज हप्ते कोठून भरायचे व घर कसे चालवायचे ? असे जीवनमरणाचे प्रश्न रिक्षा व्यवसायीकांसमोर उभे राहिले आहेत. त्यात बँक आणि फायनान्स कंपन्या हप्ते न भरल्याने रिक्षा जप्त करून घेऊन जात आहे. म्हणून अशा वाईट परिस्थितीत सरकारकडून आर्थिक मदत रिक्षाचालकांना मिळावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात आली आहे.
Comments are closed