या पुरूषांच्या कृतीवर पिंपरी-चिंचवड परिसरात प्रश्न उपस्थित होत आहेत?
●फुकटच्या प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी होती का?
● झाडांचा श्वास गुदमरतो तर याच पुरूषांनी धागे का गुंडाळले?
● वट पोर्णिमेला मानून तीच पत्नी मिळावी म्हणून व्रत केले व त्याच पत्नीला सोबत घेऊन वटवृक्षाचे धागे कापले ही त्या सणाची, परंपरेची थट्टा नाही का?
पिंपरी, दि. १९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील एका सामाजिक जनजागृती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फुकटच्या प्रसिद्धी साठी केलेल्या वट सावित्रीच्या सणाचा वापर पाहुन नागरिकांतून टीकेची झोड उडत असून महिला भगिनींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या संघटनेच्या पुरूष कार्यकर्त्यांनी आम्हाला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून चक्क वट पोर्णिमेचे व्रत करत वटवृक्षाला फेरे मारत धागे गुंडाळले. आणि हे सर्व जनतेला समजावे म्हणून विविध वृत्तपत्रात बातम्या छापूनही घेतल्या एवढ्यावर थांबतील ते कार्यकर्ते कसले? म्हणून त्याच बातम्या समाज माध्यमांद्वारे सर्वत्र पुन्हा प्रसारितही केल्या.
आणि मग अचानक पर्यावरण प्रेम जागृत झाले आणि साक्षात्कार झाल्याप्रमाणे ज्या पत्नी साठी धागे बांधले चक्क त्या पत्नीस सोबत घेऊन ते धागे कापले. त्यामुळे या व्रताच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रकार या महाशयांनी केल्याने साहजिकच महिला वर्गाच्या रोषाला यांना सामोरे जावे लागणार. कारण पर्यावरण प्रेमाच्या नावावर एका सणाची व त्या धार्मिक परंपरेची विटंबनाच होत असल्याचे नागरिकांचे मत समोर येत आहे.
एखादा सण हा साजरा करण्यासाठी असतो स्वतः ची फुकटची प्रसिद्धी करण्यासाठी नसतो . आता राहिला धाग्यांचा प्रश्न तर सद्यस्थितीत या पुजे साठी वापरण्यात येणारा धागा हा सुती लगेच तुटणारा व कुजणारा असा असतो तसेच कुजल्यानंतरही खत म्हणून झाडांना उपयोगी होवू शकतो. मग झाडांचा श्वास कसा गुदमरतो? असेही नागरिकांतून बोलले जात आहे.
Comments are closed